नवीन लेखन...

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती । परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।। लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा । जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।। झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा । तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।। प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकाहत्तर

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून ! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे […]

मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन

“मै दीनदार बुत-शिकन..!” “मै दीनदार कुफ़्र-शिकन..!” (“मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!”) असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..! […]

कोण्या एकीचे मनोगत

केसांच्या काळ्या भोर लटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळूच लक्षात येते….. “देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची …..” कालपरवा पर्यंत “ताई” म्हणणारे अचानक काकू, मावशी, किंवा आजी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते….. “किती छान आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय …” टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी […]

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते! […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तर

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 27-नैवेद्यम् समर्पयामी-भाग एक आपल्यासाठी देवपूजेतील एक महत्वाचा उपचार म्हणजे नैवेद्य. कारण आपणाला निश्चितपणे माहिती असते, की जो नैवेद्योपचार आपण देवासाठी म्हणून करत आहोत, तो देवासाठी नसून, आपल्या देहासाठीच आहे. तो नैवेद्य नंतर आपणालाच खायला मिळणार आहे. मग तो गणपतीचा मोदक असो किंवा म्हसोबासाठीचा बोकड. नाव देवाचे […]

आठ आण्यातलं लग्न

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला १२ जून रोजी अठरा वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या लग्नाची ही कथा […]

बोलघेवडे काका

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीने पद्माकरकाकांचं पार्थिव आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या दरवाज्यासमोर डोळे मिटून हात जोडताच माझ्या मनाच्या पाखराने नागपुरातील धरमपेठेत झेप घेतली. खूप वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्याच्या सवयीमुळे मला प्रश्न पडला ‘हा शब्दांचा नायगारा फॉल्स, की तोटी चोरीला गेल्यामुळे पाण्याचा अखंड वर्षाव करणारा नगरपालिकेचा सार्वजनिक नळ?’ त्या भेटीत काकांच्या संवादाच्या […]

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा. जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष […]

1 6 7 8 9 10 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..