नवीन लेखन...

ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकार स्नेहल भाटकर

स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित […]

शांता हुबळीकर

चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९१४ रोजी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. याच दरम्यान कोल्हापूर […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झरिना वहाब

अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या अभिनयानं सजलेला ‘घरोंदा’ हा हिंदी सिनेमा अनेकांच्या आजही स्मरणात आहे. तिचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी झाला. चितचोर हा चित्रपट ही खूप गाजला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब यांनी काम अप्रतिम केले होते. ‘चितचोर’ चित्रपटात नायिकेची भूमिका करून एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या झरिना वहाब हिने तिच्यापेक्षा सहा वर्षाने लहान […]

पटकथा लेखक सचिन भौमिक

१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी झाला. त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, […]

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ

नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३, ‘एक था टायगर’ असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कतरिना कैफ. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा […]

चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते

जेष्ठ मराठी गायिका माणिक वर्मा या वंदना गुप्ते यांच्या आई. ‘अभिनेत्री’, ‘चारचौघी’, ‘अखेरचा सवाल’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न्’, ‘सुंदर मी होणार’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘श्री तशी सौ’, ‘सोनचाफा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा अनेक नाटकांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केलं. त्यांचा जन्म १६ जुलै रोजी झाला. मात्र त्यांना स्वतःची ओळख दिली ती ‘अखेरचा सवाल’ या नाटकानं. अरुण जोगळेकर, दया डोंगरे, दत्ता […]

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व

बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी झाला.रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि […]

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर

मोगुबाई कुर्डीकर या किशोरी अमोणकर यांचा मातोश्री. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी झाला.अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन […]

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।। कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।। कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।। जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार, माझी […]

1 13 14 15 16 17 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..