परमोच्य बिंदु
ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय होऊन जाता सारे परि ते तेव्हांच घडते […]