कवी शांताराम नांदगावकर
“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. ‘पाहिले न मी […]