ज्येष्ठ अभिनेते प्राण
प्राण किशन सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवले. खलनायक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. लोकांमध्ये त्यांची भिती अशाप्रकारे होती,की त्याकाळी कुणीच आपल्या मुलाचे नाव प्राण ठेवत नव्हते. मात्र “उपकार’मधील मलंग चाचाच्या भूमिकेनंतर त्यांची पडद्यावरील प्रतिमा साफ बदलून गेली. […]