नवीन लेखन...

मराठी कलावंत वसंत पवार

आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर नाव येतं ते ‘सांगत्ये ऐका!’ हेच, या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. ‘बुगडी माझी सांडली ग..’ हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे. […]

स्मिता तळवलकर

स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले […]

मालती/मधुमालती

।। सुमुखाय नम: मालतीपत्रं समर्पयामि ।। मधुमालतीचा वेल असतो ज्यास मंद सुवासाची पांढरी फुले येतात. मालती चवीला तिखट,कडू,तुरट,गोड असून पचायला हल्की व शरीरात थंडपणा निर्माण करते म्हणून ती त्रिदोषशामक आहे. ह्याचा उपयोग प्रामुख्याने जखमा भरून येण्यासाठी केला जातो.मालतीच्या पानांचा रस काढून त्याने तेल सिध्द करून जखमेवर हे तेल लावतात. (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अकरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ? आयुष्य कमी होतं. त्याने काय होतं ? जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-अ /११

मराठी काव्य   :    भाग ८-अ   मराठीत अनेक जुन्यानव्या कवींनी त्यांच्या काव्यात मृत्यूचा उल्लेख केलेला आहे. पाहूं या कांहीं उदाहरणें.   आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें, झाशीच्या राणीवर स्फूर्तीप्रद काव्य लिहिलें, ‘रुद्रास […]

१.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप

एक मॅटर्निटी होम वेळ दुपार १.१५ एक प्रसूती होते आई नॉर्मल बेबी नाॉर्मल पण बाळ शांत निपचित पडून सगळी कडे आनंद मिश्रीत टेशंंन नर्सेसची धावपळ डाॅक्टरची गडबड मुख्य डॉक्टरला पाचारण मुख्य डॉक्टर कडून तपासणी निरनिराळ्या तपासण्या सगळे रिपोर्ट नॉरमल बाळ अजूनही शांत पणे पडून असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत , आणि अचानक बाळ मोठ्या […]

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात….- …अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस “चाललो हो शेट मी आता…” असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं. ….जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं ….आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं.. ….गणपती विसर्जनाचे वेळी “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना […]

जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं. ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..? मी […]

1 19 20 21 22 23 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..