नवीन लेखन...

रुसू नको गऽ ताई (बालकाव्य)

( रक्षाबंधनाच्या निमित्तानें : बालकाव्य ) रुसू नको गऽ ताई, फुगवुन् गाल तुझे तू नको बसू फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।   नको रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।। फुगा फुटू दे रुसव्याचा […]

नारळांत पाणी

(नारळीपौर्णिमेनिमित्त बालकाव्य) (चाल : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना) देवाची करणी  , नारळांत पाणी आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।   नारळाला पाहुन् करीं फळाला पकडुन् आश्चर्यचकीत होती सगळे, गुण याचे ऐकुन् । सगळे, गुण याचे ऐकुन् । दगडासम हा बाहेरुन् पण अति-मृदु असतो आतुन् म्हणुनच कां पसंत केलें नर-वानर-देवांनी ? नर-वानर-देवांनी ?   […]

अभिनेत्री मर्लिन मन्रो

अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच […]

ज्योत्स्ना भोळे

“बोला अमृत बोला…‘, “आला खुशीत समिंदर…‘ “क्षण आला भाग्याचा…‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८ व्या वर्षी […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग दहा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे. अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात. अशा […]

मुगल ए आझम

५ ऑगस्ट १९६० साली भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बहुचर्चित चित्रपट “मुगल ए आझम ” मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, या गोष्टीला ५७ वर्षे झाली. हिंदी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलेला ‘मुघल ए आझम’ हा ‘क्लासिक’ चित्रपट आज अनेक वर्षे सुजाण प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. मूळ ‘मुघल ए आझम’ चित्रपट हा देखील […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-ब/ ११

[ उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  : ( पुढे चालू ) ]     उर्दू  काव्य: प-ए-फ़ातहा कोई आए क्यों, कोई चार फूल चढ़ाए क्यों कोई आके शम्मा जलाए क्यों, मैं वो बेकसी का मज़ार हूँ  । बहादुरशाह ज़फ़र ( ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. […]

तुळस/तुलसी

।।गजकर्णकाय नम: तुलसीपत्रं समर्पयामि।। “मै तुलसी तेरे आंगन की”हे गाणे बऱ्याच जणांना माहीत असेल माझ्या माहीती प्रमाणे हा एक जुना चित्रपट होता.असो थोडक्यात काय हिंदू संस्कृतीत आणी आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीला अत्यंत मानाचे स्थान आहे. आज आपण पहातो बऱ्याच घरांमध्ये तुळशी वृंदावन असते किंवा घरा भोवताली तुळशीचे कुंपण लावतात.कारण तुळस हि रक्षोघ्न आहे अर्थात वाईट शक्ती […]

नाग पंचमी : एक चिंतन

श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा. […]

माका अर्थात भृंगराज

।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।। भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते. औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ […]

1 20 21 22 23 24 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..