जागतिक हत्ती दिवस
शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते. भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तमध्ये राजा उदयनाकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती असा उल्लेख आहे. ‘मातंगलीला’, […]