आजचा राम
विजयादशमी. आपल्या साडेतिन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त. श्रीरामाने रावणाचा वध केलेला दिवस. रामाने-रावणाचा केलेला वध म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या धामधुमीत साजरा होतो. पण होतं काय, की आपण सर्वच या एका दिवसापुरते राम बनून छाती काढून चालत असतो; बाकीच्या दिवशी मात्र आपण साक्षात रावणही लाजेल अशी कृत्य उजळमाथ्याने करत असतो. उजळमाथ्याने याचा अर्थ अगदी उघडपणे, निर्लज्जपणे. कारण आपल्याला रामाचा चेहेरा धारण करायला आवडतं परंतू काम मात्र रावणाचं करायला आवडतं. […]