नवीन लेखन...

पाथरवट ( दगड फोड्या) – झेन कथा

एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे आपला डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे. एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ… वरुन सूर्य आग ओकत होता.  दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखीतून मोठ्या […]

‘अदृश्य’ रूळांवर धावणारी रेल्वे चीनकडून सादर

चीन लवकरच एक अशी रेल्वे सुरू करणार आहे, जी रूळांशिवायच धावेल. ही रेल्वे अदृश्य रूळांवरून मार्गक्रमण करणार आहे. चीनमध्ये व्हर्च्युअल रेल्वे ट्रकवर धावणाऱया या नव्या प्रकारच्या रेल्वेचे पहिले दृश्य दाखविण्यात आले आहे. चीनच्या या सेवेचे नाव ऑटोनॉमस रॅपिड ट्रान्झिट (एआरटी) ठेवण्यात आले आहे. ही रेल्वे 30 मीटर लांब असून यात असे सेन्सर बसविण्यात आले आहेत, जे रस्त्याची लांबी-रुंदी आणि विस्तार स्वतःच जाणून घेतील. या सेन्सरच्या मदतीने रेल्वे विनाधातूच्या रूळांवरील आपल्याच मार्गावर धावणार आहे. […]

शिरीष

ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात. ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न […]

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या ! […]

मराठी कवी, गीतकार, ना.धों. महानोर

महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी […]

हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर

भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे – सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची […]

कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी

मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे वडिल वीणा वादक तर आजी व्हायोलीन वादक होती. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष

आपल्या कॅमेर्यारने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल आणि पदवी शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यायतून झाले होते. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणार्याच दृष्टीने […]

लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा […]

प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पं. वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. […]

1 8 9 10 11 12 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..