नवीन लेखन...

संगीतकार जोडी अजय-अतुल (गोगावले)

सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, […]

सूर्यनमस्काराची  निर्मिती

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. […]

करंज

ह्याचा मध्यम आकाराचा ८-१६ मी उंचीचा वृक्ष आहे.ह्याची पाने २०-४२ सेंमी लांब असतात तर पत्रके ५-१० सेंमी लांब असून हि ५-७ पत्रके असतात.फुले निळसर पांढरी असून प्रत्येक फळात अंडाकार किंवा वृक्काकार बी असते.हि बी १.७-२ सेंमी लांब व १.२-१.८ सेंमी रूंद असते.ह्यात तांबुस रंगाची तैलयुक्त बीज असते. करंजाचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने,बीज.करंज चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचा […]

भारतीय नावाचे “बेगडी” राष्ट्रीयत्व

एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” ….. […]

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार बाबुराव गोखले

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच! नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी […]

संगीततज्ज्ञ गुरुवर्य प्रा. बा. र. देवधर

संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत. […]

हळुहळु हळू किती वितळतो हा काळोख..

१९७१ साली औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी अनिल औदुंबरला आले असताना त्यांच्या त्या मुक्कामातील हृद्य क्षण टिपले आहेत- प्रख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी.. त्यांच्या उत्कट, भावश्रीमंत शैलीत! १९७१ ची रात्र. शांत असलेले, अंधारात अधिकच दिसेनासे झालेले, काळ्या दगडी बांधणीचे भिलवडी रेल्वेस्टेशन. कसलीच जाग नव्हती. सिग्नल्सचे हिरवे-तांबडे दिवे. काळोखात तरंगत असल्यासारखे. दोन […]

वृद्धजीवनशास्त्र

आजपर्यंत आपण वृद्धांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना होणारे त्रास, त्यांचे केवीलवाणे जीवन, तरुणांकडून त्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्लक्ष यांसारख्या विषयांवर बरेच काही बोललो आहोत, ऐकले आहे, वाचले आहे आणि थोडेफार पाहीले पण आहे. या विषयावरचे डोळ्यांतुन अश्रुंचे पाट व्हायला लावणारे ‘चिमणी पाखरे’ पासून ते ‘बागबान’ पर्यंतचे अनेक चित्रपट पण पाहीले आहेत. पण अनेकांनी ‘वृद्धजीवनशास्त्र’ हा शब्द […]

आधुनिक शिक्षण – तारक की मारक ?

१५ – २० वर्षांपूर्वी च्या काळातील आरती मधे बाळ गोपाळांचा सहभाग .. प्रसादाची धमाल वगैरे आठवली … आणि आता बाळगोपाळांपेक्षा वयस्कर जास्त दिसतात … प्रसाद संपत नाही … मुले परदेशी शिकायला … नोकरी साठी आहेत … किंवा कामावर आहेत .. सुट्टी होती पण काम राहिले होते … […]

‘इंडियन’ राष्ट्रीयत्वाचे कारस्थान…

आज नवीन पिढी मराठी वापर कमी करीत आहे, त्यांचा मराठी शब्दसंग्रह कमी होत आहे…मराठी भाषेत चांगले साहित्य फार कमी प्रमाणात निर्माण होत आहे.. आणि मला हा सर्व एखादया कारस्थानाचा भाग वाटतो आहे.. मी कितीही बुद्धिवादी असलो तरी मी मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी समाज यांच्या ऱ्हासाचा विचार सुद्धा करू शकत नाही… तो भाग माझ्या भावनेचा आहे आणि तिथे माझा बुद्धिवाद तोकडा पडतो हे मला मान्य आहे. […]

1 11 12 13 14 15 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..