नवीन लेखन...

मराठीतील प्रगल्भ अभिनेत्री भक्ती बर्वे

भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट […]

नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत. […]

चित्रपट व नाट्य अभिनेते अतुल कुलकर्णी

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. […]

जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग नऊ

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे एकावन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग नऊ ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे […]

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत!

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत..! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का..? कोणत्याही धर्मातील लोक देवाला का मानतात हो? कारण त्यांची देवावर श्रद्धा असते. प्रत्येक धर्माची आपल्या देवावर श्रद्धा बाळगण्याची वेगवेगळी पद्धती असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लोक आपल्या देवाची मूर्तीपूजा करून देवाप्रती असलेली आपली श्रद्धा दर्शवतात. त्यात वाईट असे काही नाही. […]

संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी

हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते. मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन […]

लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या […]

ताम्र शेंगी

हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले. […]

राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र का केला ?

जुन्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहित असतील, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकारांना देखील या माहित आहेत पण अनेक नवीन कार्यकर्त्याना माहित नसेल म्हणून हि माहीती, अनेकांना प्रश्न पडत असेल की नक्की साहेबांना असा काय त्रास दिला कि त्यांनी सेना सोडली…? त्यांनी सोडली नाही, तर त्यांनी सोडून जावं या साठीच “अनेकांनी” प्रयत्न केले. […]

1 14 15 16 17 18 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..