नवीन लेखन...

१७७६ ची पहिली ब्राम्हण रेजिमेंट

पूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून ! […]

प्रदक्षिणा

प्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात. […]

गणेशमूर्ती आणि वाढत्या विकृती !

दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. […]

कथिल पाणी

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’ […]

झेंडूची फुले

माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे. […]

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव

माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. […]

बालगंधर्वांचे वारसदार.. ओमप्रकाश चव्हाण

” कोकणचा बालगंधर्व” असा ज्याचा उल्लेख केला जातो, देशभरातील अनेक मान्यवरांनी ज्यांची प्रशंसा केली, देशभरातील प्रतिष्ठेचे कैक पुरस्कार ज्याच्या अभिनयाने आपल्याकडे खेचून आणले.” कलावंत हा नेहमी साधाच असतो, माझ्या सौंदर्याने आणि कलेने मला लोकांत ओळख दिली. एकदा तोंडाला रंग चढविल्यानंतर मी त्यांचा होऊन जातो…!” दशावतार कोकणची एक कला ही जीवंत ठेवण्यात ओमप्रकाशचा हात मोलाचा आहे. जास्त धनाची अपेक्षा न बाळगता कलेची श्रीमंती त्यांच्या चेहर्‍यावर तरळत असते. सततची जागरणं आणि लोकांचे मनोरंजन आयुष्यभर या रंगमंचाची सेवा. खरंच ग्रेट ओमप्रकाश..! तुझ्यातील कलावंताला माझा सलाम…! […]

आडनांवं आणि जात – ही जोडी फोडणं अावश्यक

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं […]

प्रतिक्रिया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।। फेकतां जोराने,  आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा,  होई तुमचे उरीं  ।। शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील,  तुमचेच पाठीं  ।। प्रेमाने बोलणे,  सुंगध आणिते  । आनंदी लहरी,  मनां सुखावते  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

1 17 18 19 20 21 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..