नवीन लेखन...

सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल

प्यारेलाल रामप्रसाद शर्मा उर्फ प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर उर्फ लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,  या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई,  तेथ कुणाची कल्पकता धगधगणारे अंगारे हे,  जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी,  येईल कधी का समज मर्मा वरती घाव बसता,  सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे,  हलके हलके जाती मिटूनी त्या दुःखीताला जाणीव असते,  जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी समरस होतो,  इतर […]

निसर्गकवी माधव केशव काटदरे

‘हिरवे तळ कोकण’ लिहिणारे काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी झाला. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. त्यांची नोकरी कस्टम खात्यात होती. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी […]

लयभास्कर, तालकंठमणि लक्ष्मण पर्वतकर उर्फ खाप्रुमामा

खाप्रुमामा ना त्यांची आई ‘खाप्रु’ असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका […]

मुंगी

मग्न राही सतत आपल्याच कामीं अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे

राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे, सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “करीन ती पूर्व” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “जयभवानी” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे, “ ऐका हो ऐका” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना […]

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।। […]

जेलची हवा

आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग तीन

आपले कार्य उत्तम व्हावे असे वाटत असेल तर कल्याणकारी रत्न, गुरु, माता पिता, आदि पूज्य व्यक्ती, यांना वंदन करून, तसेच तूप खाऊन बाहेर पडावे. मुद्दाम हा विषय इथे सांगण्याचे कारण आज तुपाला एवढी नावं ठेवली जातात, इथपर्यंत मजल पोचली आहे, की तुप म्हणजे जणु काही विषच म्हणे ! घोर कलियुग म्हणतात, ते हेच. […]

लेखक,कवी वि.स.खांडेकर

वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वि.स. खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि […]

1 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..