वाट पंढरिची पावन ही
पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई वाट पंढरिची पावन ही ।। चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।। सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।। प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास […]