ज्येष्ठ कवी प्रा. वि. म. कुलकर्णी
वि. म. कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी भरलेल्या कविसंमेलनात सहभाग घेतला. त्यांच्या कवितांना श्रोत्यांच्या पसंतीची दादही उत्तम मिळत असे. त्यांनी लिहिलेली ‘न्याहरी’ हा संग्रह आणि ‘विसर्जन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली. त्यांची ‘झुक झुक गाडी’ सारखी बालगीतं, तशीच ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ सारखी दहावीच्या पुस्तकातील कविता लोकप्रिय होती. […]