नवीन लेखन...

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।। आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।। एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।। दुजामध्ये […]

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

कैलास मानसरोवर यात्रा

देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला, नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

स्वर्गाचे सरकार

जगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”. या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्‍या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत. […]

महाराष्ट्राचे “आपले सरकार”

महाराष्ट्रात ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही. सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल… आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील. […]

1 9 10 11 12 13 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..