मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक अनंत माने
अनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला. […]