त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा
राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान […]