आली दिवाळी..दिवाळी पाडवा..
वर्षभर आतुरतेने वाट पाहात असलेल्या दिवाळसणाचा, बघता बघता तिसरा दिवस उजाडला. आजचा दिवस पाडव्याचा. साडेतिन मुहुर्तांपैकी आजचा दिवस हा अर्ध्या मुहूर्ताचा. आजची कार्तिक शुद्ध प्रतिपदा ‘पाडवा’ नांवानेच ओळखली जाते. महाजनांच्या प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द. भाद्रपदा’चं कसं ‘भादवा’ केलं, अगदी तस..! आजच्या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी […]