नैराश्यावर बोलू काही
आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!! […]