बस तारीख पे तारीख !
पुरोगामी महाराष्ट्राला सुन्न करून सोडणारी एक बलात्काराची भीषण घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली .अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्दी गावात एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी पाशवी अत्याचार केले गेले. शरीराला पिडा देण्यापासून तर सरळ जीव घेण्यापर्यंतच्या पिशाच्च वृत्तीचा परिचय आला.घटनेनंतर कोपर्दी व आसपासच्या लोकांनी तीव्र निदर्शने केली .संप झाला.बंद झाले.सम्पूर्ण महाराष्ट्रीय समाजाला तीव्र वेदना झाल्या .त्याचे पडसाद विधानसभा हादरवन्या पर्यंत […]