नवीन लेखन...

सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।।   रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।।   रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।।   हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।।   सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।। […]

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं […]

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे  । कष्ट सोसले शरिर मनानें,  चिज तयाचे झाले दिसे…..१ बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने  । यश ना पडले पदरी.  केव्हा मान फिरविता नशीबाने….२ निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती  । शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३ लिहीता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता  […]

जेष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर

डीडी हे त्यांचे टोपण नाव….. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्याा डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी पुण्याजवळ कोंडुर येथे झाला. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन […]

बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा

विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते.  त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले […]

वडिलांचा आशिर्वाद

  नव्हतो कधींही कवि वा लेखक     कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी     काव्य मजला सूचू लागले    १ वाङ्‍मयाविषयी प्रेम होते     वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले     पुस्तके वाचूनी सगळी   २ खो – खो मधल्या खेळा सारिखे     खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज     ते गेले चटकन निघूनी   ३ गोंधळून गेलो […]

पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट

पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट सांगताना केरसी लॉर्ड , दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत असत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले […]

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. […]

वेळेची एक संकल्पना

वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक                स्थरावर. मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते. दोन प्रश्न आहेत. १) काय ?   अर्थात काय असावे .   २)  कसे […]

मक्षिकेचे आत्मसमर्पण

उडत उडत एक मक्षिका,  देव घरांत ती शिरली, पुजा साहित्य आणि मूर्तिवरी स्वच्छंदानें नाचूं लागली…१,   धुंदीमध्ये बागडत होती,   मूर्तीच्या ती बसे शिरावरी धूप, गंध आणि सुमनावरूनी,  जाई मध्येच प्रभू चरणावरी…२,   पंख चिमुकले हलवीत ती,  मूर्तीपुढें गांवू लागली प्रसाद दिसतां पंचामृताचा,  प्रभू अर्पिण्यासी झेपावली…३, नैवेद्याच्या क्षीर सागरीं,  आत्मसमर्पण तिने केले प्रभू सेवेत तल्लीन होवूनी,  जन्माचे […]

1 3 4 5 6 7 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..