कालिदासाचा न्याय
भोज राजाच्या पदरी असलेला कालिदास चांगला कवी होताच. परंतु इतर कवी व कलावंतांचीही त्यालाचांगली कदर होती. गोरगरीबांनाही तो राजाकरवी मदत देई. एकदा एक दरिद्री शेतकरी कालिदासला भेटला व त्याने आपले दारिद्रय करण्याची विनंती केली. कालिदासाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. मात्र, येताना रिकाम्या हाताने न येता राजासाठी ऐपतीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू घेऊन ये, अशी सूचना केली. […]