प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं आवश्यक आहे.
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं कायद्याने अनिवार्य करणं आवश्यक आहे. काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. […]