चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते बाबूराव पेंढारकर
१९२० साली बाबूराव पेंढारकर यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी झाला. मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. […]