कोण?
कोण फिरवतो कालचक्र हे? दिवसामागून रात्र निरंतर कोण मोजतो खेळ संपता? आयुष्याचे अचूक अंतर कोण निर्मितो श्वासांसाठी? करूणेचा हा अमृतवारा कोण फुलवतो आठवणींनी? रंध्रारंध्रातुन पिसारा कोण राखतो काळजावरी? शरीराचा हा खडा पहारा कोण शिकवतो कसा धरावा? स्वप्नांमधला मुठीत पारा कोण ठरवतो; पाऊस येथे कधी दडावा, कधी पडावा? कोण सांगतो कधी कसा अन, कोणावरती जीव जडावा? कोण […]