प्रसिद्धी
वर्तमानकाळात उभा राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ मी दोन्ही पाहतोय… भूतकाळ बरा होता , भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय… मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय… त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय माझी प्रसिद्धी ! माझ्या प्रेयसीचा हात हातात घेऊन… मी प्रेमाची शिक्षा भोगतोय आतल्या आत गुदमरतोय… निलेश बामणे ( बी डी एन )