लोकल प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरचे महाकाय पंखे !
नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी […]