भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत
त्यांनी मुंबईतील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालया’तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली होती. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत यांचा जन्म ३१ मे १९१० रोजी इंदूर येथे झाला. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात ‘माय मॅगझिन’ हे पुस्तक/नियतकालिक आणि […]