सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला
सुशीलादेवी पवार यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवींचा जन्म २२ मे १९१५ रोजी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला.सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कुलात त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. सुशीलाबाईंचे लग्न पी.के.सावंत नावाच्या एका वकिलाशी झाले होते. ते मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याशी घटस्फोट […]