नवीन लेखन...

मधुमेहापासुन मुक्ती

मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते. मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो. […]

दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव !

१० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील ” छंदोत्सव २०१७ “ या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी ,उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व […]

संगीतकार राहुल रानडे

संगीतकार राहूल रानडेंचा जन्म २३ मे १९६६ रोजी झाला. १९८६ सालच्या सई परांजपे लिखित-दिग्दर्शित ‘माझा खेळ मांडू दे’पासून राहुल रानडे यांचा नाटय़प्रवास सुरु झाला. आज पर्यत २०० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं तसेच मराठी, हिंदी चित्रपट यांना राहुल रानडे यांनी संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे. काकस्पर्श, वास्तव,अस्तित्व, कोकणस्थ, सुंबरन,साने गुरुजी,डॉ.प्रकाश आमटे अशा मराठी, हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिले आहे. राहुल रानडे यांनी […]

व्यायाम करणे हि कला, स्थुलतेची टाळे बला

अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा ! हाss हाsss काय झालं हसू आलं ना? पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते – 1. माझे शेड्यूल […]

माणूस, मरण आणि मसणवटा..

प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले […]

आपण

आधीच्या पिढीत जन्माला आलो आहोत.. आपल्याला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत.. आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही. शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत.. आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही.. तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते, आपण कधी बिसलेरी घेतली नाही.. आपण चार जणांत एकाच ग्लासातून […]

जेष्ठ मराठी गायिका ललिता देऊळगावकर फडके

ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला […]

संगीतकार एल.पी उर्फ लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडतील लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरंतर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभुत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लता दिदींना साथ केली. त्यावेळी […]

जेष्ठ अभिनेते सुनील दत्त

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश […]

नांदत्या घराची किंमत

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते. 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज […]

1 177 178 179 180 181 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..