नवीन लेखन...

आजच्या तरुणांपुढील आव्हाने

शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे. जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का? सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे […]

अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत […]

आपली प्राचीन खाद्य संस्कृती

जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही, पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा, कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ल्या जात होता. […]

जीवन

जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत  चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं […]

१६ मे – पहिला ऑस्कर पुरस्कार

८८ वर्षापूर्वी १६ मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार दिला गेला. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते. १६ मे १९२९ रोजी ऑस्कर पुरस्कार म्हाणजेच […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग छत्तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो. निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून […]

आपलं गोजिरवाणं बिर्ढ

आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥ “वालाचं बिर्ढ” नेहमीच “नंबर वन”, त्याचा पहिला मान दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥ चवीष्ट लोभसवाणं “बिर्ढ” खाणा-यांची भूकही वाढवतं ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥ कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।। बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता गरिबासी मदतीचा […]

जेष्ठ गायिका माणिक वर्मा

अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा —क्षणभर उघड नयन देवा —तुझा नि माझा एक पणा —निघाले आज तिकडच्या घरी–झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुण्यात झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, […]

दादर टी. टी. आणि मांजरं

दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे. पूर्वीच्या ट्राम्स इथपर्यंत येऊन, या सर्कलला वळसा घालून पुन्हा कुलाब्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघत, […]

1 187 188 189 190 191 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..