नवीन लेखन...

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा

राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. […]

तेल तुपाचे भूत

अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या […]

जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल

फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटली येथे झाला. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्या म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी सेवाभाव, समर्पण आणि प्रेम यांचे प्रतीक असलेल्या आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला होता. हा दिवस जगभर जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका […]

जागतिक कुटुंब दिन

१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱया मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले […]

बंगाली गायक सुबीर सेन

हेमंतकुमारसारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर जयकिशन यांच्या मुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १५ मे १९३२ रोजी झाला. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे गाणे ‘दिल मेरा […]

धक धक गर्ल माधुरी दीक्षित

‘सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने. माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा […]

जेष्ठ निरुपणकार दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे […]

फेसबुक चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्याचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात […]

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार सचिन खेडेकर

१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला. मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे. […]

प्रख्यात अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

१९२४, नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’ तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे […]

1 189 190 191 192 193 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..