सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते
इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. […]