नवीन लेखन...

संगीतकार सी.अर्जून

अर्जुन चंदीरामानी हे सी. अर्जून यांचे नाव. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. सी.अर्जुन म्हणजे बुलो सी रानी या सिंधी संगीतकाराचा सहायक. वडील गायक त्यामुळे घरचं वातावरण संगीताला पोषक. सी. अर्जून १९६० सालापासुन चित्रपट सृष्टीत कार्यरत होते. १९६० साली रोड नं. ३०३ या चित्रपटाने त्यांची सुरुवात झाली. ‘पास बैठो तबीयत मचलं जायेगी’ १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुनर्मिलन’ चित्रपटातील हे […]

भरताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ : २६ जानेवारी १९५० ते १२ मे १९६२ स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पेशाने वकील होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले. […]

पंडित जवाहरलाल नेहरु

कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ७ फेब्रुवारी १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी […]

‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे

आनंद भाटे हे एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत अधिकारी पदावर काम करतात. आपली नोकरी सांभाळून ते गायन करतात. आनंद भाटे यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९७१ रोजी झाला. त्यांचे पणजोबा भाटे बुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, आनंद भाटे यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या […]

स्वार्थ..

कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई […]

झुबिन मेहता

झुबिन मेहता यांचे वडील मेहिल हे उत्तम व्हायोलिन वादक होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९३६ रोजी झाला. त्यांनी मुंबईत बॉम्बे सिम्फनी ऑर्केस्ट्रा नावाची संस्थाही स्थापन केली होती. पारशी कुटुंबात जन्मलेल्या झुबिन मेहता यांना डॉक्टर व्हायचे होते, मुंबईच्या सेंट मेरी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्समध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण त्या वेळचे वातावरणच असे होते, की त्यांच्या वडिलांच्या […]

विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा

राजा रवि वर्मा, (एप्रिल २९, इ.स. १८४८- ऑक्टोबर २, इ.स. १९०६) हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रवींचा जन्म […]

तबल्याचा जादूगार उस्ताद अल्लारखा खान

उस्ताद अल्लारखा खान यांना तबल्याचा जादूगार अस म्हटल जाते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. उस्ताद अल्लारखा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली.तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा […]

मराठी नाट्य-सिने अभिनेते मोहन गोखले

घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले. मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे. शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ? इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत […]

1 203 204 205 206 207 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..