नवीन लेखन...

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]

नमस्काराचे महत्व

जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. […]

यष्टीमधू/ज्येष्ठमध

ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची […]

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला,  थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फूटतां,  हाती येईल काय ते ? उंच हा गिरीराज देखूनी,  शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी,  चढणे सोपे काय ते ? अथांग सागर खोल जरी ,  डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता,  सूर मारणें जमेल कां ते? काव्य सरिता वाहात आहे,  ज्ञान गंगोत्री […]

जेष्ठ संगीतकार रोशन

रोशनलाल नागरथ ऊर्फ “रोशन” यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी गुजरानवाला येथे झाला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ […]

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी

त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या “श्वास” आणि “डोम्बिवली फास्ट” या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक […]

रोशन – कलात्मक संगीतकार

हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, […]

संगीतकार चित्रगुप्त

चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू […]

मिनाक्षी शेषाद्री

शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झारखंड येथे झाला. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो […]

रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. […]

1 22 23 24 25 26 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..