नवीन लेखन...

धृपद-धमाराचे गायक मुकुल शिवपुत्र

मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. […]

अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. ‘गुजरा हुआ जमाना’ आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील  श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या […]

हवाई दलाची युद्धसज्जता : चिंतेचा विषय

हवाई दलाच्या विमानांचे दोन मोठे अपघात १४ मार्च रोजी झाले. त्यात सुखोई ३०एमकेआय हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. त्याच दिवशी चेतक हेलिकॉप्टरही अपघातग्रस्त झाले. या अपघातांमध्ये पायलट बचावले. मात्र, जिथे हे अपघात झाले त्या जमिनींवर सामान्य माणसे मात्र जखमी झाली. दोन्हीपैकी सुखोई हे विमान अत्याधुनिक समजले जाते. त्या आधीचे अपघात हे मिग या जुन्या विमानांचे होत […]

विशाल जुन्नर आणि विश्वासार्हता

परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप…  एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे  लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन […]

शुद्ध बीजापोटी- पुरुषबीज शुक्र

संत तुकाराम महाराज म्हणतात; ‘शुद्ध बीजापोटी; फळे रसाळ गोमटी’ आयुर्वेदाने गर्भनिर्मितीसाठी जे चार अनिवार्य घटक सांगितले आहेत त्यातील एक म्हणजे बीज हा होय. बीज म्हणजे शब्दश: बी-बियाणे. जसे शेती करताना ठराविक पीक येण्यास त्याचे उत्तम दर्जाचे बियाणे पेरावे लागते तसेच गर्भधारणेसाठी पुरुष आणि स्त्री या दोहोंची बीजे शुद्ध असणे गरजेचे असते. याकरताच आचार्य सुश्रुतांनी तर ‘शुक्रशोणितशुद्धीशारीर’ […]

गोविंदराव तळवलकर

कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय. मला समजायला लागल्यापासून पेपर वाचणं हा माझा छंद. आज वयाच्या ५१ व्या वर्षीही पेपर वाचल्याशिवाय दिवसाची […]

स्वाईन फ्ल्यू

सध्या स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याच्या बातम्या आहेत. स्वाईन फ्ल्यू होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फुलांचे पाणी प्यावे असा माझा अनुभव आहे दोन ग्लास पाण्यात एका झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या, निशीगंधाची 5-7 फुले, तुळशीची 5-7 पाने रात्रभर ठेवा सकाळी ते पाणी गाळून एक वाटी व संध्याकाळी एक वाटी प्यावे घरातील प्रत्येकाने. हे रोज करणे आवश्यक आहे. ह्यात गलांडीचे […]

सत्कार – नगरसेवकांचा की नागरिकांचा

नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते. त्यातून लागलेल्या निकालाने ते दोनही भाऊ आश्चर्यचकीत झालेले आहेत असाही निश्कर्ष काढता येईल. मात्र दोघांची मती सारखीच गुंग झालेली असली तरी एकाची अपेक्षाभंगाने […]

आईस्क्रिम

उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही. आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग नऊ

आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये. लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, […]

1 241 242 243 244 245 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..