शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ
आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून ‘मंगल प्रभात’मध्ये ऐकायला येतो. त्यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी झाला.अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते. बज गई शहनाई, शादी अब होनेवाली है, असा संदेशा पोचविणा-या ह्या शहनाईला बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले. […]