नवीन लेखन...

जेष्ठ संगीतकार गुलाम मोहम्मद

बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा […]

शशी कपूर

बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. त्यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला.घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत […]

भारतीय लेखक, पत्रकार खुशवंत सिग

पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस… खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके… प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक […]

पी.सी. अलेक्झांडर

पी.सी अलेक्झांडर यांना भारतीय राजकारणात गांधी घराण्याचे विश्वाकसू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९२१ रोजी झाला. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून १९८१ ते […]

पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे

राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील ‘आंख का तारा’, ‘भक्त और भगवान’, व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, ‘शमशरे आलम’ या […]

हृदयविकार आणि पक्षाघात

हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होणे (शरीराचा एक भाग लुळा पडणे) या दोन्ही विकारांचे कारण त्या त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात रक्तपुरवठ्यास निर्माण झालेला अडथळा हे असते. असा अडथळा निर्माण होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. या कारणांपैकी बरीच कारणे आता शास्त्राला उलगडलेली आहेत. या आजारांचा प्रतिबंध म्हणजे या कारणांचा प्रतिबंध करणे. सर्वच माणसांनी याबाबत जागृत […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात. बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, “नीट चावून चावून गिळा.” यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत. हल्ली […]

राजा केळकर संग्रहालय

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. […]

नोटा बदली आणि अटलजी 

८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .  ५०० रुपयांच्या नवीन […]

जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग

23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले. पहिला हल्ला तोफेच्या धडका देत झाला. तो करमसिंग यांच्या गस्ती पहारा ठाण्यावर. […]

1 245 246 247 248 249 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..