नवीन लेखन...

मिनाक्षी शेषाद्री

शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झारखंड येथे झाला. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो […]

रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. […]

मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी पुणे येथे झाला. सुहास शिरवळकर यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत […]

कवयित्री शिरीष पै

दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. […]

शापित योगी

संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर .पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर यांनी जागवलेल्या आठवणी.. १५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. तो दिवस होता दिवाळीतला पाडवा. अतिशय शुभ दिवस. डी. डीं.चे वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच […]

पं.नारायणराव बोडस

थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे […]

सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग

भारताचे सातवे पंतप्रधान सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून असली तरी त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंग होते. वयाच्यापाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता […]

शनिकथा व इतिहास

आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे. […]

बुलेट ट्रेनचा खरा चेहरा…!

हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल. […]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली […]

1 23 24 25 26 27 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..