तुटलेला अंगठा
गुरूजी, तुम्ही सकाळी जरा होता घाईतच लवकर गटवायची असेल ना खेडवळ शाळा ? तुटलेल्या चपलेचा अंगठा जोडून घेताना आज शहराच्या चौकात पाहिले मी तुम्हाला .. तिथेच मारलीत गाडीला मोजून हवा अन् अडकवलात ट्यूशनवाल्याच्या बॅनरला भाकरीचा डब्बा… तसे एकलव्याने गुरूदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा गुरूजींनो,सरांनो,साहेबांनो परत कधी जोडणार आहात ? परत कधी जोडणार आहात ? ©विठ्ठल जाधव शिरूरकासार, […]