नवीन लेखन...

वर्‍हाडातली गाणी – १४

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

आरती प्रभू

एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी झाला.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्याल मा.आरती प्रभूंच्या यांच्या वडिलांना अर्थार्जनासाठी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 13

एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?….. गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?… आमची अर्धी लाकडं गेली मसणात….. काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून…. आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?…… जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?…… विज्ञानावर, […]

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ….१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड……२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें….३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती…४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक […]

वर्‍हाडातली गाणी – १३

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवाशीण सून घरात येना कैसी सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासरे गेले समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची […]

मराठमोळी गायिका साधना सरगम

साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म ७ मार्च १९७४ दाभोळ येथे झाला.बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये […]

गणपतराव जोशी

शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला. गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवून गणपतरावांनी अतिशय लोकप्रियता संपादन केली. […]

मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक मकरंद देशपांडे

डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रूपाया. त्यांचा जन्म ६ मार्च १९६६ रोजी रत्नागिरी येथे झाला.‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख […]

हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील कलाकार अनुपम खेर

अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप. आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ? सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन […]

1 262 263 264 265 266 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..