नवीन लेखन...

बॉम्बे टू गोवा – एव्हरग्रीन चित्रपटाची ४५ वर्षे

३ मार्च १९७२ हा दिवस…. बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली. एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं […]

केस गळतीवर करा खालील उपाय

तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्या आधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री […]

चरीत्र अभिनेते इफ्तिखार

सय्यादिना इफ्तिखार अहमद शरीफ उर्फ इफ्तिखार यांचा जन्म जालंदरचा. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला.मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केल्यानंतर इफ्तिखार यांनी कला लखनौ कॉलेज पासून चित्रकला डिप्लोमा कोर्स केला. इफ्तिखार यांना गाण्याची आवड होती आणि प्रसिद्ध गायक कुंदनला सेहगल यांच्या गायनावर ते प्रभावित होते. १९४४ साली तकरार” या चित्रपटाने त्यांनी बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. चित्रपट समीक्षक श्री.इसाक मुजावर यांनी […]

निसर्गोपचारतज्ज्ञ नेहमीच डॉक्टर नसतात…

कायद्यानुसार; स्वतःला निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीकडे आयुर्वेदाची BAMS ही पदवी नसल्यास ती व्यक्ती रुग्णांना कोणतेही आयुर्वेदीय औषध वा पंचकर्म इत्यादि देऊ शकत नाही. आपण ज्यांच्याकडून असे उपचार घेत आहात त्यांच्याबद्दल वरील मुद्द्यांबाबत खात्री करून घ्या. […]

ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक

दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला.त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि ‘भारतीय महिला नॅशनल फेडरेशन’ अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला. त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. रुपेरी पडद्यावरील मायाळू आई व खत्याळ सासूच्या भूमिका […]

सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार

१२ मिनिटात २८८ योगासने. सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने. सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब. एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये […]

धर्मात्म्याची ओळख

संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्‍याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. […]

स्वस्तिकाद्वारे चिकित्सा

आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे […]

बहुगुणी आपटा

आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते. दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही […]

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

अलीकडे नोकरदार स्त्रियांमध्ये त्यातही विशेष करून संगणकाशी संबंधित काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामुळे चेहरा थकल्यासारखा दिसतो. पार्टी अथवा समारंभाला जाताना मेकअपच्या साहाय्याने ही वर्तुळे झाकता येत असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते. तसेच ही वर्तुळे अनारोग्याची सूचना देणारी असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांबाबत […]

1 267 268 269 270 271 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..