नवीन लेखन...

नारळ….. खोबरं

खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या… तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली… दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली…. यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार… आता या प्रत्तेक […]

मालवणी ढोल

ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच…. पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे…. आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो… मिऴालाच तर फोटोही देईन….. पहिला महत्वाचा फरक बांधणीचा .. याच खोड…बहुधा फणसाचे…. पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती…. आणी […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 5

सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ? हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली. वो हुआ कुछ इस प्रकार… एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी “फिस्ट” चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन […]

गवती चहा

गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, […]

चतुरस्त्र तरुण – पराग सावंत

आवड असली की सवड मिळते असं म्हणतात; मात्र आवड असली की शिक्षणही मिळतं हे आता पराग सावंतकडे पाहिल्यावर कळतं. बीएससी झाल्यावर इंटरनेटलाच आपला गुरू मानून नृत्य, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, एडिटिंग यांचं शिक्षण घेतलं. आवड म्हणून बाबांनी त्याला कॅमेरा आणून दिला. त्यावेळेस तो एका एशियन हार्ट कार्डिकमध्ये कंपनीत नुकताच कामाला लागलेला. बीएससी झाल्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला होताच; मात्र मनात […]

लायब्ररी

एक वास्तू माझ्या-तुमच्या, सगळ्यांच्या कॉलेजमध्ये आहे. आपण येता-जाता ती नेहमीच बघतो. कोणती ही वास्तू?आठवतं का? ही आहे आपल्याच कॉलेजमधली लायब्ररी. बरेच दिवस इथे तुमची पावलं फिरकली नसतील तर चला एक फेरफटका मारू. कॉलेजातली लायब्ररी.. एका कोप-यातली.. शांत शांत. जिथे पाऊल टाकताना तिथल्या शांततेचा दबदबा वाटतो. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की सर्व कोप-यांमध्ये अचूक नजर ठेवून […]

बंध ऑनलाईन मैत्रीचे

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या […]

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ २६ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्यास गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी […]

चित्रपट निर्माते मनमोहन देसाई

मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ […]

निर्लज्ज..

भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली… आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली… माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली…. लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…! त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं… आणि त्याच्याच […]

1 271 272 273 274 275 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..