उक्ती आणि कृतीतील अंतर
कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक – उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे […]