नवीन लेखन...

हृदय परिवर्तन

क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी […]

पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा

८५ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या […]

दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक परेश मोकाशी

‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात […]

कवी प्रदीप

कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर (उज्जैन ) येथे झाला. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

निवडणुकीतील ए, बी फॉर्म म्हणजे काय?

ए,बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून ‘ए’ फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या […]

युवा दिवस

भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला. स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि […]

भारतीय शास्त्रीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा विषय नाही. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच झालो. शास्त्रीय संगीतामधे प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या […]

फेसबुकचा मार्क झुकेरबर्गच्या यशाचे १० मंत्र

अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता. स्वप्न बघा झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले होते, सर्वात श्रीमंत होण्याचे, जगात प्रसिद्ध होण्याचे. त्यासाठी त्याने कष्ट केले. जर तुम्हालाही तसेच यश […]

किचन क्लिनीक – तांदुळ

कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते. ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का. सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी […]

1 290 291 292 293 294 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..