नवीन लेखन...

सॅबोटाज ,सबव्हर्जन आयएसआयची नवी रणनिती

पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे. आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर – भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे […]

राष्ट्रीय रायफल्सची टीम व अशोक चक्र विजेता

जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. 25 जानेवारी संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले होते. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

‘सु’संवाद साधा !!

‘शादी का लड्डू’ खाऊन झालेल्यांना प्रत्येक वेळेस तो पचतो असं नाही. काही काळातच छोट्या छोट्या कुरबुरी सुरु होतात. या छोट्या छोट्या कुरबुरी दुर्लक्षित ठेवल्या तर काही काळातच मोठ्या कटकटी बनतात आणि हळूहळू त्या जोडप्यांत वादविवाद सुरु होतात. या अडचणी ठरवून केलेल्या लग्नांतच (arranged marriage) येतात असं नाही हं!! काही महिने ते काही वर्षं ‘डेटिंग’ नंतर झालेल्या […]

पं भीमसेन जोशी यांच्या काही आठवणी…

पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अनेकांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्यातील काही….. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती मा.डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. गौतम राजाध्यक्ष  मी पुण्याला चाललो होतो. […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १९

खावे. पण गरज असेल तर खावे. खावे. पण आवडत असेल तर खावे. खावे. पण हितकर असेल तर खावे. खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे. खावे. पण भूक असेल तर खावे. खावे. पण पचवू शकत असेल तर खावे. खावे. पण तयार करता येत असेल तर खावे. खावे. पण जिभेला चव असेल तर खावे. सगळ्या यातना काढतोय […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।। संसारांत रमलो,मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त […]

पं. भीमसेन जोशी – थोडक्यात जीवनप्रवास

भीमसेन जोशी म्हणजे ‘गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच […]

देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..

आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १८

आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो. म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही. जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. […]

1 294 295 296 297 298 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..