मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी
महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या […]