मराठीतील कवी, व ध्येयवादी नाटककार सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव
सदाशिव अनंत शुक्ल यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्यात महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म २६ मे १९०२ रोजी झाला. स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या […]